
लातूर, 02 ऑगस्ट, (हिं.स.)। महान गायक स्वरसम्राट पद्मश्री मोहम्मद रफी यांच्या सृतीदिनाच्या निमित्ताने शहरातील मोहम्मद रफी मार्गाच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने सामूहिक अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना मोहम्मद रफी सारखा अष्टपैलू गायक भविष्यात होणार नाही. त्यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत करण्याचा प्रयत्न केला अशी भावना व्यक्त केली.
तर कार्यक्रमाचे संयोजक तथा अकादमीचे अध्यक्ष युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी मोहम्मद रफी यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून प्रेम,शांती, राष्ट्रभक्ती वध्दींगत करण्याचा संदेश दिला आहे. रफीं सारख्या महान गायकाचा आणी त्यांच्या कलेचा सन्मान करण्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून त्यांचा गौरव करणे गरजेचे आहे.या मागणीचा सर्व कला प्रेमींनी पाठपूरावा करावा असे अवाहन त्यांनी केले.तर नगर परिषदेचे गटनेते नगरसेवक राहूल शिवपूजे यांनी बोलताना अहमदपूर च्या सांस्कृतिक चळवळीत साहित्य संगीत कला अकादमीचे योगदान मोठे असल्याचे सांगीतले.
या प्रसंगी गफारखान पठाण,बजरंग गायकवाड, उत्तमराव कांबळे,शेख मन्नानभाई,अँड.रवी गायकवाड,मोहम्मद पठाण, नौशाद सय्यद,डाॅ.बालाजी थिट्टे,राजुभाऊ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis