सिटी बस सेवा सुरू होताच गंगापुरात ज्योतीराम चिवडे पाटलांचे जंगी स्वागत
लातूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील ग्रामीण व शहरी भागाला जोडणारी सिटी बस सेवा मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वारंवार बंद पडत होती. या समस्येविरोधात भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चिवडे
सिटी बसचे आगमन


लातूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील ग्रामीण व शहरी भागाला जोडणारी सिटी बस सेवा मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वारंवार बंद पडत होती. या समस्येविरोधात भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चिवडे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला दिलेल्या टाळे ठोक आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून, सिटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या यशाबद्दल गंगापूर नगरीतील ग्रामस्थांच्या वतीने चिवडे पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

शहर व परिसरातील नागरिकांना भेडसावणारा सिटी बसचा प्रश्न सोडवण्यासाठी चिवडे पाटील यांनी कोणताही विलंब न करता लातूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

येत्या तीन दिवसांत सिटी बस सेवा पूर्ववत न झाल्यास महानगरपालिकेला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

या आंदोलनाला भाजप शहर जिल्हाध्यक्ष मा. श्री. अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी खंबीर पाठिंबा दर्शवला होता. या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेत मनपा प्रशासनाने तातडीने बैठक बोलावून सिटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला.

गंगापूर येथे जल्लोषात स्वागत.

सिटी बस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्याने शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बस सेवा पूर्ववत झाल्याचे समजताच गंगापूर नगरीतील गावकऱ्यांनी एकत्र येत 'गोरगरिबांचे कैवारी' म्हणून ओळखले जाणारे ज्योतीराम चिवडे पाटील यांचा जंगी सत्कार केला. या प्रसंगी गावकऱ्यांनी चिवडे पाटलांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

जनतेच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर – ज्योतीराम चिवडे पाटील सत्काराला उत्तर देताना चिवडे पाटील म्हणाले:

नेत्यांचे पाठबळ: लातूर जिल्ह्याचे नेते तथा माजी पालकमंत्री आ. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर, आ. रमेश आप्पा कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. बसवराज पाटील आणि अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आपण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावू शकत आहोत. जनतेचा विश्वास: शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि कामगारांच्या न्यायासाठी मी सदैव तत्पर आहे. गंगापूर आणि परिसरातील जनतेच्या कोणत्याही अडचणीत मी खंबीरपणे पाठीशी उभा राहीन.

या कार्यक्रमास गंगापूर सोसायटीचे सदस्य दगडू भाई शेख, बलभीम भोसले, अप्पाराव मिंड, तुळशीदास चिवडे, राजकुमार गोरे, विकास चिवडे, अर्जुन रसाळ, चालक देशमुख, फारुक शेख, अब्दुल शेख, शांतिनाथ नाथबोने, सुरज शेख, आत्माराम शेलार, पाशा शेख, जमीर शेख यांच्यासह गावातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande