
सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.) मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस तसेच उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गतहेसमाधान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेवशिबिरात 1824 दाखल्यांचे वितरण करण्यात आले . महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान व्हावे व जनतेला एकाच छताखाली विविध विभागाच्या योजनांचा लाभ प्रमाणपत्रे,दाखले,इत्यादी लाभ मिळण्यासाठी महाराजस्वसमाधान शिबिराचे आयोजन उत्तर तहसील कार्यालयामार्फत अथर्व गार्डन,घोंगडे वस्ती,भवानी पेठ,सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजय देशमुख यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याचप्रमाणे स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये प्रलंबित फेरफार,7/12व ई-3दुरुस्ती,डिजिटल7/12,उत्पन्न,जात व रहिवासी दाखले,नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र,गावठाण सनद,मुख्यमंत्री बळीराजा योजना,सामाजिक अर्थसहाय्य,विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले,अतिक्रमण नियमितीकरण,जिवंत सातबारा,जन्म-मृत्यू आदेश,सिंधी विशेष अभय योजना,नोंदणी शुल्काबाबत मार्गदर्शन आदी सेवांचा समावेश होता. या शिबिराचा एकूण1824लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी प्रांत अधिकारी पडदुणे,उत्तर तहसीलदार नीलेश पाटील,नगर सेविकारोहिणी तळवळकर,अमोल बापू शिंदे,संतोषभाऊ पवार,जुबेर बागवान,स्थायी समितीच्या सभापती रंजीताताई चाकोते,डॉ. किरण देशमुख,माजी सभागृहनेते संजय कोळी,छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान प्रमुख राजकुमार पाटील,मंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगू,मंडल अध्यक्ष सिद्धार्थ मंजेली,तसेच नगरसेवक,विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी,लाभार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची विविध शासकीय कामे एकाच ठिकाणी जलद व सुलभ पद्धतीने मार्गी लागल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.
--------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड