परभणी - अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव स्पर्धेत मराठवाडा हायस्कूलची उल्लेखनीय कामगिरी
परभणी, 02 ऑगस्ट (हिं.स.)। बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आयोजित इतिहास महाराष्ट्राचा–२०२६ या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित एकपात्री नाट्यछटा, स्वगत, समूह नृत्य व नाटुकले सादरीकरण महोत्सवाच
अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव स्पर्धेत मराठवाडा हायस्कूलची उल्लेखनीय कामगिरी सई चिटणीसला द्वितीय, तर समूह नृत्याला तृतीय क्रमांक; विद्यार्थ्यांच्या यशाने शाळेचा गौरव


परभणी, 02 ऑगस्ट (हिं.स.)। बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आयोजित इतिहास महाराष्ट्राचा–२०२६ या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित एकपात्री नाट्यछटा, स्वगत, समूह नृत्य व नाटुकले सादरीकरण महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत एन.व्ही.एस. मराठवाडा हायस्कूल, परभणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी वैष्णवी मंगल कार्यालय, परभणी येथे झालेल्या प्राथमिक फेरीत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अभिनय आणि नृत्यकलेचे उत्कृष्ट सादरीकरण करून परीक्षकांची मने जिंकली. एकपात्री अभिनय स्पर्धेत कु. सई आशिष चिटणीस हिने प्रभावी अभिनयाच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच समूह नृत्य स्पर्धेत मराठवाडा हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या चमूने उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली. या यशासाठी विद्यार्थ्यांना श्री. विशाल धानोरकर, सौ. कल्पना खटिंग, सौ. कल्पना गरुड, श्री. विनोद लोलगे, श्री. राम बंडे तसेच सौ. राधिका दिनेश राठी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत कु. सई चिटणीस, कु. आचल राठी, कु. आरोही जाधव, कु. आराध्या जाधव, कु. काव्या ठाकरे, कु. मयुरी जाधव, कु. निहारिका राठी आणि कु. आरोही तुरे यांनी सहभाग नोंदवत आपल्या अभिनय व नृत्यकौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला. या यशाबद्दल नूतन विद्या समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री. विजयराव जोशी, उपाध्यक्ष श्री. अनिल अष्टुरकर, श्री. दिलीप कुलकर्णी, सचिव श्री. संतोष धारासुरकर, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा सहसचिव श्री. अनंत पांडे, उपमुख्याध्यापक श्री. कापरे, कोषाध्यक्ष श्रीनिवास मुंदडा, संचालक श्री. वेंकटेश तोरंबेकर, संचालिका सौ. मालेगावकर, संचालिका सौ. मंगरूळकर, सेमी संस्कृत विभागाचे पर्यवेक्षक श्री. पाटील, सहपर्यवेक्षक श्री. रामपूरकर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत शैक्षणिक क्षेत्राबरोबरच कला, संस्कृती आणि इतिहासाच्या जतनासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मराठवाडा हायस्कूलच्या यशस्वी परंपरेत आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande