एसआयआर साठी अवघे काहीच दिवस शिल्लक ; नागरिकांनी मॅपिंग पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा - परळी नगराध्यक्षा
बीड, 02 ऑगस्ट (हिं.स.)। * ८ ऑगस्ट ही अंतिम तारीख त्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करा विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू असून प्रत्येक पात्र मतदाराची नोंद आणि मॅपिंग पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. ८ ऑगस्ट ही अंतिम तारी
पद्मश्री धर्माधिकारी


बीड, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

* ८ ऑगस्ट ही अंतिम तारीख त्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करा

विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू असून प्रत्येक पात्र मतदाराची नोंद आणि मॅपिंग पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. ८ ऑगस्ट ही अंतिम तारीख असुन या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नागरिकांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.

मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा सर्वात मोठा आधार आहे. त्यामुळे कोणताही पात्र मतदार एसआयआर प्रक्रियेपासून वंचित राहू नये. ज्या नागरिकांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही त्यांनी तातडीने आपल्या परिसरातील बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. नोकरी, शिक्षण, व्यवसाय किंवा इतर कारणांनी बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनीही आपल्या कुटुंबीयांशी अथवा संबंधित बीएलओ यांच्याशी संपर्क साधून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी. आज घेतलेली थोडीशी खबरदारी उद्याचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवेल. प्रत्येक नागरिकाने ही जबाबदारी ओळखून सहकार्य करावे. आपले कुटुंब, नातेवाईक आणि शेजारी यांनाही एसआयआर प्रक्रियेबाबत जागरूक करा. आपल्या शहरातील एकही पात्र मतदार वगळला जाणार नाही, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असेही नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी म्हटले आहे. ८ ऑगस्ट ही अंतिम तारीख असुन परळी शहरातील नागरिकांनी उर्वरित कालावधीत बीएलओ यांना सहकार्य करून १०० टक्के एसआयआर मॅपिंग पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande