जालना - मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। जालना येथे जय भोले मित्र मंडळाच्या २१ व्या अमरनाथ यात्रेच्या यशस्वी समारोपानिमित्त भव्य विशाल भंडारा, गरजवंत नागरिकांना साड्या व उबदार कंबलांचे वाटप, तसेच मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या साम
Q


छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। जालना येथे जय भोले मित्र मंडळाच्या २१ व्या अमरनाथ यात्रेच्या यशस्वी समारोपानिमित्त भव्य विशाल भंडारा, गरजवंत नागरिकांना साड्या व उबदार कंबलांचे वाटप, तसेच मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात शिवसेना उपनेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते गरजू महिला व नागरिकांना साड्या आणि कंबलांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार खोतकर यांनी समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगत जय भोले मित्र मंडळाच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरात अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करत आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. समाजोपयोगी उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या प्रसंगी मनपा उपमहापौर राजेश राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले, सुधाकर निकाळजे, अनिल खंडागळे, मेघराज चौधरी यांच्यासह जय भोले मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande