पुणे–दुबई आणि पुणे–बँकॉक विमानसेवा पुन्हा सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा
पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आलेलीपुणे–दुबई आणि पुणे–बँकॉकही थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील प्रवासी, पर्यटक तसेच व्यावसाय
airport


पुणे, 02 ऑगस्ट (हिं.स.)आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आलेलीपुणे–दुबई आणि पुणे–बँकॉकही थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील प्रवासी, पर्यटक तसेच व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सेवा बंद असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुणेकरांना मुंबई विमानतळाचा पर्याय स्वीकारावा लागत होता. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते. आता थेट उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना दुबई आणि बँकॉकसाठी अन्य विमानतळांवर जाण्याची गरज उरणार नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वेगाने वाढणारे आयटी क्षेत्र, औद्योगिक विकास आणि व्यावसायिक उलाढाल लक्षात घेतादुबईसारख्या जागतिक व्यापार केंद्राशी थेट हवाई संपर्कअत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विमानसेवा पूर्ववत झाल्याने विशेषतः कॉर्पोरेट आणि व्यावसायिक प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. दरम्यान,बँकॉक हे भारतीय पर्यटकांचे लोकप्रिय पर्यटनस्थळअसल्याने आगामी सुट्ट्यांच्या हंगामात या थेट विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या दोन्ही आंतरराष्ट्रीय उड्डाणांमुळे पुणेकरांचे मुंबई विमानतळावरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होणार असून, पुणे विमानतळावरील प्रवासी संख्या आणि महसूल वाढण्यासही मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande