राजेश लाड राष्ट्रवादीत; कर्जतच्या राजकारणात नवी समीकरणे
रायगड, 02 ऑगस्ट (हिं.स.)। : कर्जत तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, कर्जत नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. रोहा येथे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या
Rajesh Lad joins NCP; new political equations in Karjat.


रायगड, 02 ऑगस्ट (हिं.स.)। : कर्जत तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, कर्जत नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. रोहा येथे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

या प्रसंगी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजेश लाड यांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला शुधाकार घारे, माजी नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सागर शेळके, रंजना धुळे तसेच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेश लाड यांच्या पक्षप्रवेशामुळे कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बळात वाढ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी बोलताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध असून, नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्ष अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला. राजेश लाड यांनीही पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जनतेच्या विकासासाठी आणि कर्जतच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कर्जतच्या राजकारणात या पक्षप्रवेशामुळे नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता असून, आगामी काळात त्याचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande