छ. संभाजीनगर मनपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची छाननी, कामचुकारांवर कारवाई
छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर मनपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची छाननी सुरू करण्यात आली असून, कामचुकारांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील २,११२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची लवक
छ. संभाजीनगर मनपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची छाननी, कामचुकारांवर कारवाई


छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

छत्रपती संभाजी नगर

मनपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची छाननी सुरू करण्यात आली असून, कामचुकारांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील २,११२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची लवकरच सखोल छाननी केली जाणार आहे. सहा एजन्सींमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांचा मेळावा घेऊन त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. कामचुकार व गरज नसलेल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विभागप्रमुखांकडून प्रत्येक कर्मचाऱ्याचा अहवाल मागविण्यात येणार असून अतिरिक्त कर्मचारी कमी केले जातील. तसेच आर्थिक जबाबदाऱ्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांकडेच असाव्यात, असे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. या प्रकरणामुळे महानगरपालिकेत मोठी खळबळ उडाली आहे कर्मचारी आता काय भूमिका घेतात आणि प्रशासन काय करते यावर सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande