माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र अभियानांतर्गत अहमदपूर येथे उबाठा पक्षाची बैठक संपन्न
- गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्याचे संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण यांचे आवाहन लातूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अहमदपूर आणि उदगीर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज अहमदपूर
माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र


- गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्याचे संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण यांचे आवाहन

लातूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अहमदपूर आणि उदगीर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज अहमदपूर येथील जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या 'जिजाई' निवासस्थानी पार पडली. लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत ही बैठक पार पडली.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण म्हणाले की, 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' या कार्यक्रमांतर्गत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. लातूर जिल्ह्यातील गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्यासाठी नव्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षातील विविध पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात याव्यात. यामध्ये बीएलए (BLA), शाखाप्रमुख, सर्कल प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख यांसह विविध पदांवर निष्ठावान शिवसैनिकांना योग्य तो न्याय देऊन सक्षम संघटनात्मक पक्षबांधणी करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बैठकीदरम्यान आगामी राजकीय व संघटनात्मक रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, तालुकाप्रमुख प्रशांत मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande