छ. संभाजीनगर बसस्थानकात हृदयविकाराचा झटका आलेल्या महिलेचा वाहकाने वाचवला जीव
छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका येऊन ती बेशुद्ध पडली. यावेळी वाहक संगीता पालवे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षक क
छ. संभाजीनगर बसस्थानकात हृदयविकाराचा झटका आलेल्या महिलेचा वाहकाने वाचवला जीव


छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकात एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका येऊन ती बेशुद्ध पडली. यावेळी वाहक संगीता पालवे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षक कविता भुतेकर यांनीही मदत केली. वेळेत मिळालेल्या प्राथमिक उपचारांमुळे महिलेची श्वसनक्रिया पूर्ववत होण्यास मदत झाली. त्यानंतर तिला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या धाडसी आणि तत्पर कृतीबद्दल प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांनी संगीता पालवे यांचे कौतुक केले. छत्रपती संभाजी नगर येथील बस स्थानकात हा प्रकार घडला वेळीच कंडक्टरने मदत केली आणि कारवाई केली याबद्दल कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande