संजय राऊत यांनी आधी स्वतःची पात्रता सिद्ध करावी; सुदर्शन यादव यांचा पलटवार
सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली
संजय राऊत यांनी आधी स्वतःची पात्रता सिद्ध करावी; सुदर्शन यादव यांचा पलटवार


सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी स्वतःची पात्रता आणि राजकीय योगदान तपासावे. माणसारख्या दुष्काळग्रस्त मतदारसंघातून जयकुमार गोरे हे सलग चार वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले असून, त्यांच्या कार्याची जनतेने वारंवार दखल घेतली आहे, असे त्यांनी नमूद केले.

यादव यांनी पुढे आरोप केला की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील निकाल आणि जनाधाराच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वापरलेली भाषा अयोग्य आहे. लोकप्रतिनिधींविषयी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

भाजपच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्याचा उल्लेख करताना, त्यांच्या विकासकामांमुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांना जनतेचा सातत्याने पाठिंबा मिळत असल्याचा दावा यादव यांनी केला. तसेच, राजकीय टीका करताना संयमित भाषा वापरण्याची गरज असल्याचेही त्यांनी आपल्या निवेदनातून म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande