छ. संभाजीनगर दौऱ्यात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची महिको सीड्सला भेट
छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। भारत सरकारचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह हे छत्रपती संभाजीनगर-जालना जिल्हा दौऱ्यावर आले असता. गिरीराज सिंह यांनी महिको सीड्समध्ये बियाणे संशोधन, उच्च दर्जाचे बियाणे उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, अत्
अ


छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। भारत सरकारचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह हे छत्रपती संभाजीनगर-जालना जिल्हा दौऱ्यावर आले असता. गिरीराज सिंह यांनी महिको सीड्समध्ये बियाणे संशोधन, उच्च दर्जाचे बियाणे उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी संशोधनाला चालना देणे, नव्या तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करणे आणि त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

महिको सीड्सचे प्रमुख राजेंद्र बारवाले यांनी कंपनीच्या संशोधन कार्याचा, बियाणे निर्मिती प्रक्रियेचा आणि विविध प्रकल्पांचा आढावा केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडला. कंपनीकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

या प्रसंगी महिको सीड्सचे प्रमुख राजेंद्र बारवाले, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, शिवसेना नेते भास्कर आंबेकर यांच्यासह महिको सीड्सचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भेटीच्या शेवटी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी महिको सीड्सच्या संशोधनाधिष्ठित कार्याचे आणि कृषी क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत, आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून भारतीय शेती अधिक सक्षम करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande