विठ्ठल-रुक्मिणीच्या पुजेसाठी ३ ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणी सुरू
सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या श्री विठ्ठल नित्यपूजा, श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा तसेच महानैवेद्य सहभाग योजना यांसाठी ३ ऑगस्ट रोजी सक
Vithal


सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या श्री विठ्ठल नित्यपूजा, श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा तसेच महानैवेद्य सहभाग योजना यांसाठी ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. ही माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.

मंदिर समितीकडून विविध धार्मिक पूजांची सुविधा टप्प्याटप्प्याने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येत असून, या उपक्रमाला महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश आणि देशातील विविध राज्यांतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन पूजेची नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी करताना कोणतीही अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयामार्फत नोंदणीसाठी मदत आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पूजांच्या अटी, शर्ती आणि अधिक माहितीसाठी भाविकांनी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande