अमरावतीत राजकीय 'दहीहंडी' पेटली; नवनीत राणांचे सूचक रील चर्चेत
अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावतीत दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका रीलमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मजब
अमरावतीत दहीहंडीवरून राजकीय 'दहीहंडी' पेटली; नवनीत राणांचे सूचक रील चर्चेत


अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

अमरावतीत दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका रीलमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

मजबूत होने मे मजा ही तब है जब सारी दुनिया आपको कमजोर करने पर तुली है.... तो मजबुती से आगे बढिये..या पोस्ट केलेल्या रीलमुळे राणांचा रोख नेमका कोणाकडे आहे—विरोधकांवर की स्वकीयांवर—असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.अमरावती मध्ये दरवर्षी राणा दाम्पत्य भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून मोठे शक्तीप्रदर्शन करत आले आहे.यंदा भाजपच्याच काही स्थानिक नेत्यांनी अमरावतीतील वेगळ्या दहीहंडी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केल्याची चर्चा सुरू आहे.राणा दाम्पत्यासमोर आव्हान: स्वतःच्याच बालेकिल्ल्यात आणि मित्रपक्षातील स्थानिक नेत्यांकडून समांतर ताकद दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याने राणा दाम्पत्यासमोर हे नवे राजकीय आव्हान मानले जात आहे.सोशल मीडिया वॉर: याच अंतर्गत स्पर्धेतून आणि शक्तिप्रदर्शनाच्या चुरशीतून नवनीत राणा यांनी विरोधकांसह पक्षातील स्पर्धकांनाही सूचक इशारा देण्यासाठी हे रील पोस्ट केल्याचे बोलले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande