
परभणी, 20 ऑगस्ट (हिं.स.)। श्रावण महिन्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने रविवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी परभणीत भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी गुरुवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी यात्रेच्या विविध व्यवस्थांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यात्रेचा प्रारंभ श्रीक्षेत्र त्रिधारा देवस्थान येथून होणार असून वसमत रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, मृत्युंजय पारदेश्वर मंदिर परिसरातून यात्रा पुढे जाणार आहे. त्यानंतर श्री बेलेश्वर महादेव मंदिर येथे कावडीतील जलाने जलाभिषेक करून यात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी दिली. यंदाच्या कावड यात्रेत शेकडो शिवभक्त कावड घेऊन सहभागी होणार आहेत. यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी, भव्य देखावे आणि आकर्षक डीजेची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच शिवभक्तांच्या स्वागतासाठीही विशेष व्यवस्था केली जाणार असल्याने यंदाची यात्रा अधिक भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे तसेच परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस महिला जिल्हाप्रमुख गीताताई सूर्यवंशी, सखुबाई लटपटे, सुशीला चव्हाण, जिल्हा संघटक डॉ. मदन लांडगे, महानगर प्रमुख माणिक पोंढे, उपजिल्हाप्रमुख महादेव खुणे, बाळासाहेब पानपट्टे, शहरप्रमुख सचिन पाटील, अशोक गव्हाणे, रामप्रसाद रनेर, प्रदीप भालेराव, शेखर सवंडकर, राहुल ठाकूर, प्रवीण टेकाळे, महानगर संघटक शब्बीरभाई, शहाणे सर, राम कुलथे, राजकुमारसिंग टाक, राम जावळे, बाळासाहेब साबळे, दीपक शिंदे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे परभणी शहरातील शिवभक्तांनी या भव्य कावड यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रा यशस्वी करावी, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis