
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। बाभूळगाव, ता. सिल्लोड येथील पुंडलिक गोडसे यांचा मुलगा संकेत पुंडलिक गोडसे हा किडनीच्या आजाराने त्रस्त होता. डॉक्टरांनी किडनी निकामी झाल्याचे सांगितल्यानंतर वडील पुंडलिक बंडू गोडसे यांनी स्वतःची एक किडनी मुलाला देत त्याला जीवनदान दिले.
याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, पुंडलिक गोडसे आणि त्यांच्या परिवाराशी माझे अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. संकेतच्या आजारपणाच्या काळात यापूर्वीही त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्याच्या प्रकृतीची वेळोवेळी विचारपूस केली होती. संकेत आणि पुंडलिक गोडसे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
वडिलांनी मुलासाठी केलेला हा त्याग खरोखरच प्रेरणादायी आहे. सध्या दोघांचीही प्रकृती ठणठणीत असून त्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि पुढील वाटचाल सुखमय व्हावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis