छ. संभाजीनगर - भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक रोचकरी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह १५ नगरसेवक तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक रोचकरी यांनी शिवसेना पक
Q


छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह १५ नगरसेवक तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक रोचकरी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश करत पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सातत्याने मजबूत होत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व, विकासाची भूमिका आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची कार्यपद्धती यामुळे शिवसेनेच्या विचारांशी जोडले जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे.

वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा हा प्रवेश स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असून, यामुळे वैराग परिसरात शिवसेनेला मोठे संघटनात्मक बळ मिळाले आहे. आगामी काळात नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामे, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक प्रश्नांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.

याच कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रतीक रोचकरी यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. युवा नेतृत्व म्हणून कार्यरत असलेल्या प्रतीक रोचकरी यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या युवा संघटनेलाही वैराग व परिसरात मोठे बळ मिळणार आहे.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, “वैराग नगरपंचायतीतील नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच श्री. प्रतीक रोचकरी आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande