जळगावच्या दाणाबाजारातील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई
जळगाव, 20 ऑगस्ट (हिं.स.) शहरातील गजबजलेल्या दाणा बाजार परिसरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेने गुरुवारी सकाळी धडक मोहीम राबवली. सकाळी साडेदहा वाजता सुभाष पुतळ्यापासून सुरू झालेल्या या कारवाईत रस्त्याच्या जागेत वाढविण्यात आलेले दुकानांचे भाग हटविण्यात
जळगावच्या दाणाबाजारातील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई


जळगाव, 20 ऑगस्ट (हिं.स.) शहरातील गजबजलेल्या दाणा बाजार परिसरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेने गुरुवारी सकाळी धडक मोहीम राबवली. सकाळी साडेदहा वाजता सुभाष पुतळ्यापासून सुरू झालेल्या या कारवाईत रस्त्याच्या जागेत वाढविण्यात आलेले दुकानांचे भाग हटविण्यात आले. सुरुवातीला तीन दुकानांवरील अतिक्रमण काढल्यानंतर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले.उपायुक्त पंकज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली. महापालिकेच्या पथकाने दाणा बाजारातील रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. कारवाई सुरू असतानाच तीन दुकानांवरील अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे संबंधित व्यापारी आणि प्रशासनामध्ये शाब्दिक वादाची परिस्थिती निर्माण झाली. व्यापाऱ्यांचा विरोध वाढत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने टीपी विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. यानंतर अतिक्रमित जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. दुकानांची हद्द आणि रस्त्याची जागा निश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित ठिकाणी मार्किंग करून दिली. मार्किंगनंतर व्यापाऱ्यांनीही भूमिका बदलत प्रशासनाला सहकार्य करण्यास सुरुवात केली. अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोरील अतिक्रमित भाग स्वतःहून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे कारवाई दरम्यान निर्माण झालेला तणाव काही वेळात निवळला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande