नाशिक जि.प. इमारतीच्या आवारात डेंग्यूचे डास
मनपाच्या आरोग्य विभागाने बजावली नोटीस नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.) : शहरात दिवसेंदिवस डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असून, चालू ऑगस्ट महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29 वर पोहोचली आहे. दरम्यान, शहरात डेंग्यू डासांची स्थाने नष्ट केली जात आहेत. दरम
नाशिक जि.प. इमारतीच्या आवारात डेंग्यूचे डास


मनपाच्या आरोग्य विभागाने बजावली नोटीस

नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.)

: शहरात दिवसेंदिवस डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असून, चालू ऑगस्ट महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29 वर पोहोचली आहे. दरम्यान, शहरात डेंग्यू डासांची स्थाने नष्ट केली जात आहेत. दरम्यान, डेंग्यूला कारणीभूत ठरणार्या शासकीय आस्थापनांना देखील नोटिसा धाडल्या जात असून, आतापर्यंत जिल्हा परिषद नवीन इमारतीच्या बेसमेंटमध्ये तसेच आडगाव येथील एसटी वर्कशॉप परिसरात डेंग्यूच्या उत्पत्तीचे स्थळे आढळल्याप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.शहरातील शासकीय कार्यालय, इमारती डेंग्यूचे हॉटस्पॉट बनले आहेत. मनपा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत आरोग्य विभागाने त्यांना साफसफाई करा व हॉटस्पॉट नष्ट करा, अशा नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतरही कार्यवाही न केल्यास दंड आकारला जाईल, अशा इशारा दिला आहे. बांधकाम साहित्य व इतर अडगळीच्या वस्तूंमध्ये पाणी साचून डेंग्यू डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण आहे. ते पाहता आरोग्य विभागाने सहाही विभागांत ज्या बांधकाम साइट सुरू आहेत, त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.बांधकाम साइट्स रडारवर-शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असून, त्यासाठी अनेक ठिकाणी पाया खोदण्यात आला आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे चित्र आहे. एसटी वर्कशॉप येथे अडगळीत पडलेले टायर, ट्यूब व इतर भंगार साहित्य होते. त्यात पाणी साचले व डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांना नोटिसा बजावल्या. साफसफाई करून औषध फवारणी करून घ्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात तब्बल 1670 रुग्ण संशयित सापडले. मागील जुलै महिन्यात 33 पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने डेंग्यू स्थळांची शोधमोहीम हाती घेतली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande