
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याच्या, नागरिकांची कामे प्रलंबित ठेवण्याच्या तसेच आर्थिक उलाढालीच्या २५ ते ३० तक्रारी पंचायत समितीच्या सभापतींकडे प्राप्त झाल्या आहेत. ग्रामसेवकांकडून शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली असून अश्या ग्रामसेवकांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीचे सभापती कल्याण गायकवाड यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis