रत्नागिरी : अपना बाजारतर्फे शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
रत्नागिरी, 20 ऑगस्ट (हिं.स.) । विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या (बहुराज्य ग्राहक सहकारी संस्था) अपना बाजारतर्फे रत्नागिरीतील झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील विद्यार
अपना बाजारतर्फे शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य


रत्नागिरी, 20 ऑगस्ट (हिं.स.) । विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या (बहुराज्य ग्राहक सहकारी संस्था) अपना बाजारतर्फे रत्नागिरीतील झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना कंपासपेट्या, वह्या व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्याचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला. जेएसडब्ल्यूचे जनरल मॅनेजर अतुल करंदीकर आणि दिलीप नाचणकर यांचे यासाठी सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी अपना बाजार संस्थेचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, अपना बाजार संस्थेचे सदस्य सचिन बारटक्के, तसेच यश जाधव हे मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक आनंदा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या वेळी रवींद्र इनामदार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अपना बाजार संस्थेची ध्येय-धोरणे व सामाजिक बांधिलकी यांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला व विविध सहशालेय उपक्रमांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील विविध संस्था व व्यक्तींनी पुढे येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी यापुढेही अपना बाजार संस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्याध्यापक आनंदा पाटील यांनी अपना बाजार संस्थेच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाला अशोक सुतार, मारुती पाटील, नवनाथ जाधव, गौरी शितूत, अमोल मंडले, श्री. सनगरे, आदी शिक्षकांसह श्री. पवार मामा तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande