
लातूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन शाखा इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव,रेणाचे संचालक चंद्रचूड चव्हाण, रेणाचे चेअरमन अनंतराव ठाकूर देशमुख, संचालक अशोक गोविंदपूरकर, पृथ्वीराज सिरसाठ, ईश्वर गुडे,व्हा.चेअरमन प्रवीण पाटील, रेणापूर बाजार समितीचे उपसभापती शेषेराव हाके, संचालक प्रकाश सूर्यवंशी, लालासाहेब चव्हाण, रमेश सुर्यवंशी, नारायण पाटील, चंद्रचूड चव्हाण, प्रवीण पाटील, अशोक गोविंदपुरकर, लालासाहेब चव्हाण पृथ्वीराज शिरसाठ ,राजकुमार पाटील,पदम पाटील, सुरेश लहाने, ईश्वर गुडे, शिवाजी आचार्य, विवेक चव्हाण, अभिजित चव्हाण, उमर पठाण, अनिकेत हलकुडे, गोपाळ शेंडगे, किरण हाणवते, रमेश सुर्यवंशी, गणेश तुरुप, नितीन मोटेगावकर आदी सह शेतकरी सभासद उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शेतकरी, सभासद आणि नागरिकांना अधिक सुलभ, तत्पर आणि आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा बँकेकडून शाखांचा विस्तार आणि सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्रामीण भागातील शेतकरी सभासदांना केंद्रस्थानी ठेवून आपल्या कार्यपद्धतीत सातत्याने सकारात्मक बदल केले आहेत. गावागावातील नागरिकांना बँकिंग सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीच्या शाखा उभारण्यावर बँकेचा भर आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून पानगाव येथे नूतन शाखा इमारत साकारण्यात येत आहे.
पानगाव येथे उभारण्यात येणारी ही नूतन शाखा परिसरातील शेतकरी, सभासद आणि नागरिकांसाठी बँकिंग सेवेचे सक्षम व आधुनिक केंद्र ठरणार आहे.
आधुनिक सुविधा, सुसज्ज वातावरण आणि तत्पर सेवा यामुळे ग्राहकांना अधिक चांगला बँकिंग अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. विशेषतः शेती, पीककर्ज, विविध कर्ज योजना, बचत व ठेवी तसेच अन्य बँकिंग सेवांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सुलभतेने घेता येणार आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात सहकारी बँकिंग व्यवस्थेची भूमिका महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या आर्थिक व्यवहारांना सुरक्षित आणि सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा बँक करत आहे. गावागावात बँकिंग सुविधा पोहोचवून शेतकरी सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे, हा बँकेच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे.
दरम्यान, नूतन शाखा इमारतीच्या भूमिपूजनामुळे पानगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच आधुनिक सुविधांनी सुसज्ज शाखा त्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. जिल्हा बँकेच्या या शाखा विस्तारामुळे ग्रामीण भागातील बँकिंग सेवेला अधिक गती मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis