
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका सुपर शॉपीवर FDAची कारवाई, मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.
वैजापूर तालुक्यातील लाडगाव रोडवरील ‘ शॉपी’वर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली. तपासणीदरम्यान मुदतबाह्य मसाले, चहा पावडर, कसुरी मेथी, मनुके तसेच खराब झालेले सुके खोबरे विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. दुकानात अस्वच्छता, अन्नपदार्थ जमिनीवर ठेवणे आणि खाद्य व अखाद्य वस्तू एकत्र साठविल्याचेही निदर्शनास आले. सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी प्र. प्र. सुरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पंच व उपस्थित व्यक्तीसमक्ष पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएचे संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis