
लातूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
आधुनिक भारताचे शिल्पकार, संगणक व दूरसंचार क्रांतीचे जनक, भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांनी विनम्र अभिवादन केले.
तरुण भारताचे स्वप्न पाहणारे राजीव गांधी यांनी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नेण्यासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. संगणकीकरण, दूरसंचार, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी घातलेला पाया आजच्या आधुनिक भारताच्या प्रगतीचा मजबूत आधार ठरला आहे. असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis