कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला नवी बळकटी
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पैठण येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पैठण येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, मंत्रालयात आमदार विलास (बापू) संदिपान भुमरे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत पैठण व पाचोड येथील आरोग्य संस्थांबाबत चर्चा झाली.

पैठण हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून आगामी कुंभमेळ्यामुळे येथे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैठण येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा बाबत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल.

राष्ट्रीय महामार्गावरील आणि तीन जिल्ह्यांच्या सीमेलगतचे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पाचोड येथेही वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा विचार करून ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील ४०० खाटांच्या महिला रुग्णालयाचे लवकरच लोकार्पण करण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ, उपकरणे आणि पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

पैठण व पाचोड येथील प्रस्तावित आरोग्य संस्था आणि महिला रुग्णालयामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून, कुंभमेळ्यासह वाढत्या धार्मिक पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे प्राधान्य राहील.

बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, सहसंचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande