सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामातील समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवा - दादाजी भुसे
नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.)। सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामांना गती देत दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रभावी नियोजन करावे, असे निर
Implement immediate measures


नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामांना गती देत दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी वरील सटाणा मंगरूळ रस्त्यावरील सटाणा शहरातील बांधकाम समस्यांबाबत आढावा बैठक मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला दृकदृष्य प्रणालीद्वारे मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे सचिव संतोष शेलार, मुंबई रस्ते व वाहतुक महामार्ग विभागाचे उप अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी प्रशांत हेगडे तर प्रत्यक्ष सटाणा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष हर्षदा पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, प्रांताधिकारी महेश शेलार, मुख्याधिकारी ज्योती भगत, भूमिलेख उपअधिक्षक देवेंद्र भावसार यांच्यासह लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, शहरातील सीमांकन, रिमॅपिंग, क्रॉस सेक्शन ड्रॉइंग तसेच आवश्यक नकाशे तयार करण्यासाठी नगरपालिकेने संबंधित यंत्रणांना सहकार्य करावे. प्रस्तावित कामांसाठी आवश्यक माहिती संकलित करून अल्पावधीत प्रस्ताव पूर्ण करावेत. पुढील पंधरा दिवसांत संबंधित प्रस्तावांबाबत आवश्यक कार्यवाही करून त्याचा नियमित पाठपुरावा करण्यात यावा. वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करावे. शहरातील अतिक्रमण तातडीने काढण्यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करावी. भूसंपादन व संबंधित प्रक्रिया गतीने पूर्ण करून उर्वरित काम मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी. रस्ते कामात येणाऱ्या तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणी संबंधित विभागांनी तातडीने दूर करून कामाला गती द्यावी, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande