नंदुरबार - खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन
नंदुरबार, 20 ऑगस्ट, (हिं.स.) धुळे पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नद्या, नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2026- 27 साठी इच्छुक बागायतदा
नंदुरबार - खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन


नंदुरबार, 20 ऑगस्ट, (हिं.स.) धुळे पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नद्या,

नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2026-

27 साठी इच्छुक बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ) व7 (ब) चे पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा

कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयात 31 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 05:45 वाजेपर्यंत सादर

करावेत, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दे. पु. अग्रवाल यांनी एका शासकीय

केले आहे.

खरीप हंगामातील 1 जुलै 2026 ते 14 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भुसार, अन्नधान्य, चारा, डाळी,

कपाशी, भुईमूग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज भरण्यास मंजुरी देण्यात येणार

आहे.

पाणी अर्जांसाठी महत्त्वाच्या अटी व नियम:

प्राधान्यक्रम: पाण्याचे वाटप व मंजुरी करताना शासन निर्णयानुसार अन्नधान्य, भुसार व चारा पिकांना

प्रथम प्राधान्य दिले जाईल.

थकबाकी भरणे बंधनकारक: पाणी वापर करणाऱ्या थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी दरसाल

दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे.

अनाधिकृत पाणी वापरावर दंडात्मक कारवाई: पाण्याचा रीतसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ

नये. पाळी नसताना पाणी घेणे, पाण्याचा अपव्यय करणे, मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र भिजवणे, तसेच

कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींचा नमुना 7 (ब) चा अर्ज न करता पाणी

वापरल्यास पंचनामे करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

शेतचाऱ्यांची स्वच्छता: शेतकऱ्यांनी आपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे.

पाणी वापर संस्था: व्यवस्थापन हस्तांतरित झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने

पाणीपुरवठा करण्यात येईल.

टंचाई परिस्थिती: टंचाईच्या परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा

लागल्यास पिकांची नुकसान भरपाई देता येणार नाही.

शेतकऱ्यांनी विहित मुदतीत संबंधित कार्यालयात मागणी अर्ज सादर करून पोहोच पावती घ्यावी, असेही

कार्यकारी अभियंता श्री. अग्रवाल यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande