मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दाते पाटील यांचे उपोषण सुरू
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी व्हिडिओ कॉलवर चर्चाआंदोलन सुरू ठेवण्यावर दाते पाटील ठाम छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.) : मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राजेंद्र दाते पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरातील विभागीय आयुक्त कार्यालयासम
Q


चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी व्हिडिओ कॉलवर चर्चाआंदोलन सुरू ठेवण्यावर दाते पाटील ठाम

छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.) : मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राजेंद्र दाते पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज ११व्या दिवशीही सुरूच आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.

दरम्यान, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजेंद्र दाते पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसह सरकारची भूमिका आणि पुढील कार्यवाहीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

सरकारकडून आंदोलनाची दखल घेत संवाद साधण्यात आला असला तरी दाते पाटील हे आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुढील काळात कोणती भूमिका घेतली जाते आणि आरक्षणाच्या मागणीवर सरकारकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आंदोलनकर्त्यांसह मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande