
लातूर, 20 ऑगस्ट, (हिं.स.) लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये लक्ष्मीपूजेच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालत पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवल्या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. बालाजी मंगल बलराज असं या संशयिताचं नाव आहे, तो तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील रहिवाशी आहे. पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या या अघोरी लक्ष्मीपूजेची जबाबदारी या संशयिताकडे होती, असं तपासात समोर आलं आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे आणि पोलिस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकानं तेलंगणा राज्यात जाऊन ही कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis