लातूरात ७५० बाटल्या देशी दारूसह अल्टो कार जप्त; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत, गुन्हा दाखल
लातूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। विनापरवाना देशी दारूची वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने निघालेल्या दोघांवर शिरूर अनंतपाळ पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ७५० बाटल्या देशी दारूसह अल्टो कार असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निल
पोलीस कारवाई


लातूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)।

विनापरवाना देशी दारूची वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने निघालेल्या दोघांवर शिरूर अनंतपाळ पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ७५० बाटल्या देशी दारूसह अल्टो कार असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

निलंगा ते निटूर मार्गावरील हनुमंतवाडी पाटीजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वाहनाची तपासणी केली असता लिंबराज मारुती श्रीमाळे (४९, रा. अंबेगाव, ता. निलंगा) आणि माधव प्रल्हाद रुबदे (४३, रा. हनुमंतवाडी, ता. निलंगा) यांच्या ताब्यात देशी दारू आढळून आली.

पोलिसांनी सिमला संत्रा कंपनीच्या ९० मिली क्षमतेच्या ७५० सीलबंद प्लास्टिक बाटल्या, किंमत ३० हजार रुपये, तसेच एमएच-१२-सीआर-१६२० क्रमांकाची सिल्वर रंगाची अल्टो कार, अंदाजे किंमत ७० हजार रुपये, असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०४/२०२६, कलम ६५(अ)(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नसल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande