अकोला : कारला अज्ञातांकडून आग; पोलिसांत तक्रार दाखल!
अकोला, 22 ऑगस्ट (हिं.स.)। घरी पार्क करून ठेवलेल्या चारचाकी कारला अज्ञात इसमांनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कारच्या मागच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. पीडित वाहनधारक सखाराम घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपली कार न
Photo


अकोला, 22 ऑगस्ट (हिं.स.)।

घरी पार्क करून ठेवलेल्या चारचाकी कारला अज्ञात इसमांनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कारच्या मागच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

पीडित वाहनधारक सखाराम घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपली कार नेहमीप्रमाणे पार्क केली होती. त्यानंतर ते आपल्या कामासाठी बाहेर गेले होते. पहाटे ४:३० वाजता जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांची कार आगीत जळालेल्या अवस्थेत आढळली. कार जळालेली पाहून घोलप यांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे गाठले. सुरुवातीला पोलीस चौकी बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी ३-४ वेळा पोलीस चौकीत फेऱ्या मारल्या. अखेर पोलिसांनी पंचनामा करून आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचे आश्वासन दिले आहे.

तक्रार करते यांचे कोणाशीही वैयक्तिक वैर किंवा दुष्मनी नाही, त्यामुळे कोणावर थेट संशय व्यक्त करणे कठीण आहे. परंतु आगीची ही घटना कोणीतरी जाणीवपूर्वक घडवून आणली असावी, असे सखाराम घोलप यांनी सांगितले. आग लावणाऱ्या अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावी. झालेल्या नुकसानीची भरपाई / गाडी पूर्ववत करून मिळावी. अशी मागणी तक्रार करताना केली आहे.

पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande