अमरावती जिल्ह्यात १५ दिवसांपासून पावसाची दडी; खरीप पिकांवर संकट
अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाचा खंड पडल्याने कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त हो
अमरावती जिल्ह्यात १५ दिवसांपासून पावसाची दडी; खरीप पिकांवर संकट


अमरावती जिल्ह्यात १५ दिवसांपासून पावसाची दडी; खरीप पिकांवर संकट


अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाचा खंड पडल्याने कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी केवळ ६६.२ टक्के पाऊस झाला असून, सुमारे २०२.३० मिलिमीटर पावसाची तूट असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची कमतरता जाणवत आहे.

पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी होत असून, पिकांच्या वाढीवर त्याचा थेट परिणाम होत आहे. कापसाची वाढ खुंटण्याची, सोयाबीनची वाढ मंदावण्याची तसेच तुरीच्या पिकावरही ताण येण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.दरम्यान, पेरणीनंतर पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने काही भागात पिकांच्या उगवण क्षमतेवरही परिणाम झाला आहे. त्यातच कापूस, सोयाबीन, तूर आणि मूग पिकांवर विविध किडींचा तसेच पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी फवारणी केली; मात्र पावसाची अनिश्चितता आणि वाढता रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची स्थिती आहे.पाऊस नसल्याने फवारणीचे नियोजनही अनेक शेतकऱ्यांनी थांबवले आहे. महागडा लागवड खर्च, वाढता कीड प्रादुर्भाव आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. आकाशात ढग दाटून येत असले तरी दमदार पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.पीक वाचवण्यासाठी शेतकरी उपलब्ध साधनांनुसार प्रयत्न करत असले तरी पावसाचा खंड वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील पावसाची आणि पिकांच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande