
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
‘प्रकाशन सोनवणे सेवागौरव समिती’च्या वतीने आयोजित ‘सेवागौरव’ तथा डॉ.शेखर मगर संपादित ‘वंचितांचा ज्ञानदीप’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन महसूल प्रबोधिनी येथे उत्साहात संपन्न झाले..
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले.. शिक्षण, ज्ञानप्रसार आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून वंचित घटकांसाठी योगदान देणाऱ्या सेवाभावी कार्याचा गौरव या ग्रंथातून करण्यात आला आहे..
यावेळी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाठ, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे, शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री.विक्रम काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis