जीएसटी टॅक्स भरल्याच्या बनावट पावत्या देऊन ६६ लाखांचा अपहार
नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.)। : जीएसटी टॅक्स भरण्यासाठी ९४ लाख ३६ हजार ७६१ रुपये खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडून त्याच्या बनावट पावत्या देऊन व्यावसायिकाची ६६ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आ
जीएसटी टॅक्स भरल्याच्या बनावट पावत्या देऊन ६६ लाखांचा अपहार


नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

: जीएसटी टॅक्स भरण्यासाठी ९४ लाख ३६ हजार ७६१ रुपये खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडून त्याच्या बनावट पावत्या देऊन व्यावसायिकाची ६६ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी सुमित समाधान हिवाळे (रा. नाशिक) याने फिर्यादी ऋषिकेश शंकरराव सासवडे (रा. फॉर्च्यून अपार्टमेंट, गणेशनगर, गंगापूर रोड) यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीच्या कंपनीच्या जीएसटी टॅक्स भरण्यासाठी ९४ लाख ३६ हजार ७६१ रुपये त्यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यापैकी त्याने १ लाख ४० हजार ९७९ रुपये जीएसटी विभागास भरून उरलेल्या जीएसटी ९२ लाख ९५ हजार ७८२ रुपयांपैकी २६ लाख ६५ हजार रुपये फिर्यादी यांना परत केले. उर्वरीत ६६ लाख ३० हजार ७८२ रुपये जीएसटी विभागास न भरता ते पैसे भरल्याबाबतचे जीएसटी विभागाच्या बनावट पावत्या फिर्यादी यांना देऊन त्यांची फसवणूक करुन रकमेचा अपहार केला. हा प्रकार १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत फिर्यादी यांच्या एक्स्लो पॉईंट येथील कार्यालयात घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत सुमित हिवाळेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande