विजेचा धक्का लागून २२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी संजय अंबादास फुले यांचा बैलासह दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे कपाशीच्या शेतात वखर हाकत असताना विजेचा धक्का लागून २२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी संजय अंबादास फुले यांचा बैलासह दुर्दैवी मृत्यू झाला. संजय फुले हे बैलजोडीच्या साहाय्याने
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे कपाशीच्या शेतात वखर हाकत असताना विजेचा धक्का लागून २२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी संजय अंबादास फुले यांचा बैलासह दुर्दैवी मृत्यू झाला.

संजय फुले हे बैलजोडीच्या साहाय्याने कपाशीच्या शेतात वखर हाकत असताना शेताच्या बांधावर असलेल्या मोटारीच्या विद्युत वायरमध्ये अचानक बैलाचा पाय अडकला. वायरच्या संपर्कात आल्याने बैलाला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याचवेळी संजय फुले यांनाही विजेचा प्रवाह लागल्याने या दुर्दैवी दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

आमदार अब्दुल सत्तार यांनी पिंपळगाव पेठ येथे सदर दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन फुले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होत शोक व्यक्त केला. संजय यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख अत्यंत वेदनादायी आहे.

या दुःखद प्रसंगी संजय फुले यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो आणि दिवंगत संजय यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. असे आमदार सत्तार यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande