
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येत असलेल्या आणि नियोजन विभाग अंतर्गत असलेल्या महास्टाराईड ऑपरेशन (MahaSTRIDE Operation) मध्ये सोलापूर जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी राज्यातील 13 जिल्ह्यांची निवड झालेल्या यादीत सोलापूरचा समावेश असून, जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचे परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह ग्रँट (Performance-Based Incentive Grant) मंजूर करण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना पत्र पाठवून या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.सोलापूरचा स्कोर आणि क्रमांकपत्रानुसार सोलापूर जिल्ह्याला यावेळी 82% Composite Score मिळाला आहे. यामुळे राज्यातील 13 पात्र जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा 4 था क्रमांक लागला आहे. तसेच पुणे विभागातील 4 जिल्ह्यांमध्ये 3 रा क्रमांक मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या District Strategic Plans ची मुख्यमंत्री यांनी विशेष दखल घेतली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड