छ. संभाजीनगर - तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनांसाठी विशेष शिबिर
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनेंतर्गत तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन,जनजागृती मोहीम, जाणीव-जागृती कार्यशाळा, प्रचार-प्रसिद्धी,स्वयंरोजगार मेळावे,उद्योजक
Q


छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनेंतर्गत तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन,जनजागृती मोहीम, जाणीव-जागृती कार्यशाळा, प्रचार-प्रसिद्धी,स्वयंरोजगार मेळावे,उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम,आरोग्य शिबिरे तसेच तृतीयपंथीय व्यक्तींसाठी कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरू करणे आणि तृतीयपंथीयांच्या अनुषंगाने आवश्यक बाबी राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, धाराशिव आणि राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन सभागृह,धाराशिव येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमास रवि सानप,पोलीस उपअधीक्षक गुरव,जिल्हा कौशल्य विभाग,नाशिक विभागातील अशासकीय सदस्य तृतीयपंथी व्यक्ती शेख, श्रीमती पानसे,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले यांनी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी तृतीयपंथीयांना सौजन्याने वागणूक देणे,त्यांच्याबद्दल चांगली भावना निर्माण करणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच शिष्यवृत्तीच्या योजना,व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

गुरव यांनी कौशल्य विकास विभागामार्फत तृतीयपंथीयांना आर.सी.टी.च्या माध्यमातून प्रशिक्षण,रोजगाराच्या संधी तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेबाबत मार्गदर्शन केले. उमेदचे भांगे यांनी बचत गट निर्माण करून आर्थिक परिस्थिती मजबूत कशी करता येईल,याबाबत माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांनी विविध रोजगाराशी संबंधित योजनांबाबत मार्गदर्शन केले.तसेच नाशिक विभागातील अशासकीय सदस्य तृतीयपंथी व्यक्ती यांनी तृतीयपंथीयांच्या विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande