सिनसिनाटी ओपन: अव्वल मानांकित आर्यना सबालेन्काचे आव्हान संपुष्टात
सिनसिनाटी, २० ऑगस्ट (हिं.स.) जागतिक क्रमवारीत अव्वल महिला टेनिसपटू आर्यना सबालेन्का सिनसिनाटी मास्टर्सच्या चौथ्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या सारा बेझेलेककडून पराभूत झाली. बेझेलेकने सबालेन्काला ७-६ (९-७), ६-४ असे हरवून अव्वल १० टेनिसपटूंपैकी एकावर आ
आर्यना सबालेन्का


सिनसिनाटी, २० ऑगस्ट (हिं.स.) जागतिक क्रमवारीत अव्वल महिला टेनिसपटू आर्यना सबालेन्का सिनसिनाटी मास्टर्सच्या चौथ्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या सारा बेझेलेककडून पराभूत झाली. बेझेलेकने सबालेन्काला ७-६ (९-७), ६-४ असे हरवून अव्वल १० टेनिसपटूंपैकी एकावर आपला पहिला विजय नोंदवला.

पहिल्या सेटमध्ये सबालेन्काने जोरदार सुरुवात करत ५-१ अशी आघाडी घेतली. पण, ३५ व्या क्रमांकावर असलेल्या बेझेलेकने आपल्या उत्कृष्ट हालचाली आणि सततच्या दबावाचा वापर करून सामन्यात पुनरागमन केले आणि टायब्रेकमध्ये पहिला सेट ९-७ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये बेझेलेकने सबालेन्काची सर्व्हिस तीन वेळा ब्रेक केली. त्यानंतर तिने दिमाखदारपणे सामना संपवला. तिने एकही गुण न गमावता शेवटचा गेम जिंकला आणि एस मारून सामना संपवला. माझ्याकडे शब्द नाहीत. अविश्वसनीय वाटत आहे, असे बेझेलेक विजयानंतर म्हणाली. यावर्षी अबू धाबीमध्ये हार्ड कोर्टचे विजेतेपद पटकावणाऱ्या बेझेलेकचा सामना पुढील फेरीत अमेरिकेच्या मॅडिसन कीजशी होईल.

अमेरिकन ओपनपूर्वी आर्यना सबालेन्काची ही सलग दुसरी निराशाजनक कामगिरी आहे. गेल्या आठवड्यात, ती टोरोंटो मास्टर्सच्या चौथ्या फेरीतच बाहेर पडली होती. विम्बल्डनमध्येही तिला चौथ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर फ्रेंच ओपनमधील तिचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपला होता. अमेरिकन ओपन ३० ऑगस्ट रोजी सुरू होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande