गडचिरोली - शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी २५ ऑगस्टला सोडत प्रक्रिया
गडचिरोली, 20 ऑगस्ट, (हिं.स.)। विदेशी शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी प्राप्त प्रस्तावांमधून शेतकऱ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे. ही सोडत प्रक्रिया मंगळवार, दि
गडचिरोली - शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी २५ ऑगस्टला सोडत प्रक्रिया


गडचिरोली, 20 ऑगस्ट, (हिं.स.)। विदेशी शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी प्राप्त प्रस्तावांमधून शेतकऱ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे. ही सोडत प्रक्रिया मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सन २०२६-२७ साठी शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे आयोजित करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी दि. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयास अर्ज सादर करण्याबाबत कळविले होते. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून पात्र प्रस्तावांमधून शेतकऱ्यांची निवड सोडतीद्वारे केली जाणार आहे.

यासाठी दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कॉम्प्लेक्स क्र. १, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे सोडत आयोजित करण्यात आली आहे. ही प्रक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande