नाशिक - आदिवासी विकास आयुक्तालयाला रावण युवा फाउंडेशन चा घेराव
नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.)। आदिवासी विभागाचे मुख्यालय असलेल्या नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालय कार्यालयाला रावण युवा फाउंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला आहे. त्यामुळे कार्यालय परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संपू
नाशिक - आदिवासी विकास आयुक्तालयाला रावण युवा फाउंडेशन चा घेराव


नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.)। आदिवासी विभागाचे मुख्यालय असलेल्या नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालय कार्यालयाला रावण युवा फाउंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला आहे. त्यामुळे कार्यालय परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय असलेल्या नाशिक मधील आदिवासी विकास आयुक्त आयुक्तालयाला काही महिन्यापूर्वी विविध मागण्यांसाठी घेराव घालण्यात आलेला होता त्यावर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्याची आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते परंतु त्यातील काही मागण्या सुटल्या आणि काही सुटले नाहीत असे सांगितले जात आहेत.

आज गुरुवारी पुन्हा एकदा आदिवासी नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्या रावण युवा फाउंडेशन या संघटनेच्या वतीने अध्यक्ष विकी मुंजे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी तरुण-तरुणींनी नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयाला घेराव घातला आहे सुरुवातीला हे कार्यकर्ते आदिवासी विकास आयुक्तालयात जाण्याचा प्रयत्न करत होते परंतु पोलिसांनी आडविल्यानंतर हे कार्यकर्ते गडकरी चौकापासून त्र्यंबक नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती बसल्या असून त्यांची प्रामुख्याने असलेल्या मागण्यांमध्ये गडचिरोली येथे सर्पदंशाने झालेल्या मृत्यूच्या मुलींना न्याय द्या आदिवासी विकास आयुक्तालय अंतर्गत सुरू असलेले सेंट्रल किचन योजना तातडीने बंद करा यासह विविध मागण्या असून या मागण्यांवरती तातडीने निर्णय घ्या जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आदिवासी विकास आयुक्त करायला सुरू असलेला घेराव आंदोलन हे सुरूच राहणार असल्याचे विकी मुंजे यांनी सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande