
जळगाव, 20 ऑगस्ट (हिं.स.) ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०२५-२६ साठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” तसेच “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” देण्यात येणार आहेत.
उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना वर्गानुसार रु. २५ हजार ते १ लाख, तर उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवकांना रु. २५ हजार ते ५० हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील प्रस्ताव दि. २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत तीन प्रतींमध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर