
आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मासिक बैठक आज आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी बँकेच्या कामकाजासह विविध महत्त्वाच्या विषयांवर संचालक मंडळाने सविस्तर चर्चा केली.
बैठकीत बँकेच्या सध्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळातील नियोजन, बँकेच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजना आणि विविध महत्त्वाच्या बाबींवर संचालक मंडळाने विचारविनिमय केला.बँकेचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासह आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. बँकेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.बैठकीस छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis