
बीड, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
“पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा!”
माती आणि पाण्याच्या संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी बीडमध्ये ‘महा वॉकथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे.
स्थळ: पोलीस मुख्यालय मैदान ते क्रीडा संकुल, बीड
वेळ: सकाळी ६.०० ते ८.३० वा.
अंतर: ३ कि.मी.
वयोगट: १५ वर्षे व त्यावरील महिला व पुरुष
विषय: माती वाचवा, पाणी वाचवा, उद्धार सुरक्षित करा!
विद्यार्थी, युवक-युवती, महिला, अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, खेळाडू, उद्योजक, व्यापारी तसेच बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या जलजागृतीच्या लोकचळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, बीड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis