पुणे - कोंढव्यात एएनटीएफची धडक कारवाई; दोन गांजा विक्रेत्यांसह ४३ जण ताब्यात
पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)।कोंढवा परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) गुरुवारी पहाटे धडक कारवाई करत दोन गांजा विक्रेत्यांसह ४३ जणांना ताब्यात घेतले. शिवणेरी गल्लीतील काकडे वस्ती परिसरात एका धार्मिक स्थळाजवळ ही कारवाई करण्यात आली. गुप्त
पुणे - कोंढव्यात एएनटीएफची धडक कारवाई; दोन गांजा विक्रेत्यांसह ४३ जण ताब्यात


पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)।कोंढवा परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) गुरुवारी पहाटे धडक कारवाई करत दोन गांजा विक्रेत्यांसह ४३ जणांना ताब्यात घेतले. शिवणेरी गल्लीतील काकडे वस्ती परिसरात एका धार्मिक स्थळाजवळ ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने परिसराला वेढा घालत कारवाई केली.

या कारवाईत गणेश सिद्धू पाटोळे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून तीन किलो गांजा आणि सुमारे २६ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अज्जू भाई ऊर्फ अजु अहमद शेख याच्या सांगण्यावरून परिसरात गांजा विक्रीचे जाळे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पाटोळे याच्यावर यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहाटेच्या सुमारास एएनटीएफ पथकाने परिसराला चारही बाजूंनी घेरले. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने कारवाई करत दोन विक्रेत्यांसह ४३ जणांना ताब्यात घेतले.

ही कारवाई एएनटीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली. कोंढवा आणि परिसरातील अंमली पदार्थांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी पुढील काळातही कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande