मंगळवेढ्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप; सुदर्शन यादव यांचा सुषमा अंधारेंना टोला
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.) ज्यांच्या पक्षाचा निकाल न्यायालयाच्या पटलावर आहे, त्या पक्षाच्या नेत्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये, असा टोला भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना लगावला. अंधारे
grdf


सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.) ज्यांच्या पक्षाचा निकाल न्यायालयाच्या पटलावर आहे, त्या पक्षाच्या नेत्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये, असा टोला भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना लगावला. अंधारे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना यादव यांनी ही भूमिका मांडली.

मंगळवेढ्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यादव यांनी अंधारे यांच्या भूमिकेवर टीका केली. ‘ज्यांच्या पक्षाचा निकाल कोर्टाच्या पटलावर आहे, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाच्या बोर्डाबद्दल बोलू नये,’ असे यादव म्हणाले.

दरम्यान, या वक्तव्यामुळे मंगळवेढ्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात भाजपचे बलस्थान वाढले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांवर टीका करताना शिवसेनेचे काही नेते त्यांना ‘उपरा’ म्हणून संबोधत आहेत. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यादेखील सोलापूरच्या दृष्टिकोनातून ‘उपऱ्याच’ आहेत. त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा जिल्ह्यात सुरू असलेल्या आपल्या पक्षाच्या वाताहतीकडे लक्ष द्यावे, असा पलटवार भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande