सोलापूर - सांगोल्यातील विविध पक्ष कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षासह विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप
sdfg


सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षासह विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे सांगोला तालुक्यात शिवसेनेची राजकीय ताकद वाढल्याचे मानले जात आहे.

सांगोला तालुक्यातून सुमारे १०० वाहनांच्या ताफ्यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. मुंबईतील नंदनवन निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सांगोला तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी या प्रवेशाचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शेतकरी कामगार पक्षासह अन्य पक्षांतील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याने सांगोल्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande