बावनकुळे यांच्यावरील अश्लील टिप्पणीचा ओबीसी संघर्ष समितीकडून निषेध; प्रतिमेस दुग्धाभिषेक
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून सुरू असल्याचा आरोप ओबीसी संघर्ष समिती, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या
बावनकुळे यांच्यावरील अश्लील टिप्पणीचा ओबीसी संघर्ष समितीकडून निषेध; प्रतिमेस दुग्धाभिषेक


सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून सुरू असल्याचा आरोप ओबीसी संघर्ष समिती, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल कथित अश्लील टिप्पणी तसेच त्यांच्या कुटुंबीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याच्या निषेधार्थ समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक केला.

यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राची सामाजिक रचना विविध समाजघटकांच्या परस्पर सहकार्य आणि बंधुभावावर आधारित असल्याचे सांगितले. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सामाजिक ऐक्यासाठी घातक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, मतभेद व्यक्त करताना वैयक्तिक पातळीवर जाऊन अश्लील भाषा वापरणे, कुटुंबीयांना लक्ष्य करणे अथवा अपमानास्पद वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे समितीने म्हटले.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे समाजात अनावश्यक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे उपस्थितांनी सांगितले. व्यक्तींवर वैयक्तिक टीका करण्याऐवजी त्यांच्या धोरणांवर आणि निर्णयांवर वैचारिक पद्धतीने चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करण्यापेक्षा सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम ठेवण्यासाठी सर्व घटकांनी जबाबदारीने वक्तव्ये करावीत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande