सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील तब्बल ६.१६ लाख मतदार अपात्र
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। मतदारांच्या नावांच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण होत असताना सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल ६ लाख १६ हजार ८८० मतदार अपात्र ठरले आहेत. यामध्ये बेपत्ता, मृत आणि स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे. जि
Voter


सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

मतदारांच्या नावांच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण होत असताना सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल ६ लाख १६ हजार ८८० मतदार अपात्र ठरले आहेत. यामध्ये बेपत्ता, मृत आणि स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक अपात्र मतदार सोलापूर शहर मध्य मतदारसंघात आढळले आहेत.

जिल्ह्यात एकूण ३९ लाख ४१ हजार ९५ मतदार असून, त्यापैकी ३३ लाख २४ हजार २१५ मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदारांपैकी ६ लाख १६ हजार ८८० जण अपात्र ठरले आहेत. मतदारांच्या नावांचे डिजिटायझेशन करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट होती.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एकूण ३ लाख ५२ हजार ६८१ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख १५ हजार ८३७ मतदार अपात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील हा सर्वाधिक आकडा आहे. त्यानंतर सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात ३ लाख ३५ हजार १७८ मतदारांपैकी ६९ हजार ४८४ मतदार अपात्र ठरले आहेत.

अक्कलकोट मतदारसंघात ६५ हजार ५८७, पंढरपूरमध्ये ६१ हजार ९९८, तर दक्षिण सोलापूर मतदारसंघात ६० हजार ५३ मतदार अपात्र ठरले आहेत. बार्शीमध्ये ४९ हजार २५२, करमाळ्यात ४८ हजार ४२, माढ्यात ३७ हजार ४००, सांगोल्यात ३४ हजार २९७, मोहोळमध्ये ३७ हजार २८२ आणि माळशिरसमध्ये ३७ हजार ६६८ मतदारांची नावे अपात्र ठरली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande