सोलापूर - करदात्यांच्या पैशांवर डल्ला? नगरसेवक अनंत जाधव आक्रमक
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर शहरातील नागरिकांनी कररूपाने भरलेल्या पैशांचा गैरवापर करून मक्तेदारांशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिकेच्या नगर अभियंता सारिका अक्कलवार यांच्यावर केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल च
सोलापूर - करदात्यांच्या पैशांवर डल्ला? नगरसेवक अनंत जाधव आक्रमक


सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

सोलापूर शहरातील नागरिकांनी कररूपाने भरलेल्या पैशांचा गैरवापर करून मक्तेदारांशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिकेच्या नगर अभियंता सारिका अक्कलवार यांच्यावर केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली.

महापालिकेच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत जाधव यांनी प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. करदात्यांच्या पैशांचा योग्य वापर होणे आवश्यक असताना संबंधितांकडून नियमांना बगल देऊन मक्तेदारांना फायदा करून दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

नगर अभियंता सारिका अक्कलवार यांच्यावर केलेल्या आरोपांची तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी. तसेच त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी जाधव यांनी केली.

“नगर अभियंता सारिका अक्कलवार यांना निलंबित केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा आक्रमक इशारा नगरसेवक अनंत जाधव यांनी दिला.

दरम्यान, जाधव यांनी केलेल्या आरोपांमुळे महापालिकेतील आर्थिक व्यवहार आणि मक्तेदारांना देण्यात येणाऱ्या कामांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आरोपांवर महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande